योगी आदित्यनाथांच्या ३ वैमानिकांचा तडकाफडकी राजीनामा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तीन पायलट यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तीन पायलट यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पगारवाढीची मागणी पूर्ण न झाल्याने नागरिक उड्डान विभागाच्या ती संविदा पायलटांनी राजिनामा दिला. युपी सरकारने हे राजिनामे सशर्त स्वीकारही केले. यापैकी दोन पायलट सप्टेंबर तर एक पायलट ऑक्टोबरमध्ये रिलीज होईल.
नवे पायलट तैनात
सरकारनी या स्थानांवर दोन पायलटांची नियुक्ती केल्याचे समजतेय. पुढच्या १५ दिवसात नवीन पायलट पदभार सांभाळतील.
म्हणून दिले राजीनामे
संविदा पायलटांची नियुक्ती तीन वर्षांसाठी केली गेली होती. यापैकी तीन पायलट प्रवीण किशोर, जीपीएस वालिया आणि कमलेश्वर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी पगार वाढीची मागणी केली होती. सुत्रांनुसार, या पायलटांचे सध्याचे वेतन 5.20 लाख महिना इतके होते. त्याशिवाय एक लाक रुपये नाईट अलाऊंस देखील मिळत होता. पण कामाचा ताण अधिक असल्याने यांनी पगार वाढीची मागणी केली होती. पण ती पूर्ण न झाल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा पर्याय निवडला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा देण्याचे याशिवाय अनेक कारणे आहेत. परंतु, सध्या यावर कोणीही बोलण्यास तयार नाही.