नवी दिल्ली : सर्वसामान्यांना झटका बसला आहे. आजपासून सीएनजीचे दर वाढविण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली आणि जवळपासच्या शहरांमध्ये सीएनजीच्या (CNG)  किंमतीत प्रति किलो एक रुपयाने वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. सीएनजी रिटेलिंग कंपनीने याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर गॅस स्टेशन सुरक्षित करण्याच्या अतिरिक्त खर्चासह ही वाढ करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएनजीकडून वाहने आणि स्वयंपाकासाठी पाईप्सला नैसर्गिक गॅस (पीएनजी) पुरवणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने सोमवारी ट्विटद्वारे सांगितले की राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामधील (एनसीआर) सीएनजीची किंमत प्रति किलो ४२ रुपये वरून ४३ रुपये किलोग्राम झाली आहे. २ जून रोजी सकाळी ६ वाजल्यापासून हे वाढविलेले दर लागू होतील. तथापि, पीएनजीच्या किंमतींमध्ये कोणताही बदल होणार नाही. कंपनीने अखेर ३ एप्रिल रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती बदलल्या होत्या. त्यानंतर सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो युनिटमध्ये ३.२ रुपये आणि नैसर्गिक गॅसच्या दरात १.५५ रुपये कपात करण्यात आली.


कंपनीने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद मधील सीएनजी रिटेल किंमत प्रति किलो ४७.७५  रुपयांवरुन ४८.७५ रुपये करण्यात आली आहे. हरियाणामधील करनाल जिल्ह्यात सीएनजीचा दर ५०.८५ रुपये प्रति किलो तर रेवाडीमध्ये ५५.१रुपये प्रति किलो झाला आहे.