बंगळुरू : 'इन्फोसिस'चे सीईओ विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यावर आता कंपनीला नवसंजीवनी देण्यासाठी संस्थापकांपैकी एक असणाऱ्या नंदन निलेकणींना पाचारण करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सबद्दल संस्थापक नारायण मूर्तींनी गंभीर टीका केली. त्याला कंपनीच्या बोर्डानं अनेकदा उत्तर देऊनही मूर्तींचे समाधान झाले नाही. त्यानंतर गेल्या आठवड्यात सीईओ विशाल सिक्कांनी राजीनामा दिलाय. 


आता चेअरमन शेषशाई हेसुद्धा पद सोडण्याच्या तयारी असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे त्यांची जागी नंदन निलेकेणी यांचं 'इन्फोसिस'मध्ये पुनरागमन होण्याची चिन्हं आहेत.


या शक्यतेनंतर इन्फोसिसच्या शेअर्सनं बाजारात सलग तिसऱ्या दिवशी उसळी घेतलेली दिसतेय.