मुंबई : महासागरात लाखो जातींचे मासे अस्तित्वात आहेत. त्यातील असंख्या माशांच्या प्रकारांबद्दल मानवाला माहिती नसते. काही माशांबाबत तर इंटरेस्टिंग माहिती समोर येत आहे. असाच एक मासा म्हणजे  Coelacanth होय. या माशाबद्दल सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती गर्भधारणेच्या पाच वर्षानंतर  Baby Fish ला जन्म देते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायनासोरच्या काळापासून पृथ्वीवर अस्तित्व

डायनासोरच्या काळापासून  Coelacanth माशाचे पृथ्वीवर अस्थित्व असल्याचे मानले जाते. हे मासे 100 वर्षे जगतात. या माशाबद्दल सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गर्भधारणेच्या पाच वर्षानंतर आपल्या  Baby Fish जन्म देतात.


1930 पूर्वी नामशेष 



हा मासा 1930 पर्यंत नामशेष मानला जात होता. नंतर हा मासा रहस्यमयरीत्या दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर दिसला.


रात्री भ्रमंती



या अद्भुत माशाबद्दल असे म्हटले जाते की रात्री भ्रमंती करताना तो माणसाच्या आकाराचा बनतो. Coelacanth माशांच्या फक्त दोन प्रजाती आतापर्यंत सापडल्या आहेत.


50 वर्षांनंतरच गर्भधारणा



या माशाबद्दल असं म्हटलं जातं की 50 वर्षानंतरच ती गर्भधारणा करू शकते. या माशाला परिपक्व होण्यासाठी 40 ते 69 वर्षे लागतात.


समुद्राच्या पृष्ठभागाच्या 2300 फूट खाली अस्तित्व



हा मासा पृष्ठभागाच्या 2300 फूट खाली राहतो. हा मासा काही काळापूर्वी हिंदी महासागरात मादागास्करच्या किनाऱ्यावर पकडला गेला होता.