कोईम्बतूर : प्रत्येकाला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणी नाणी जमा करतं तर कुणी जुने पोस्ट कार्ड. असा काहीसा छंद कोईम्बतूरमधल्या ६० वर्षीय मूर्ती यांना जडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूर्ती यांना सिनेमाची तिकीटं जमा करण्याचा छंद आहे. १९७९ पासून पाहिलेल्या प्रत्येक सिनेमाची तिकीटं मूर्ती यांनी संग्रहित करुन ठेवली आहेत. ५० पैशांच्या तिकीटापासून ते १५० रुपयापर्यंतची सिनेमाची तिकीटे मूर्ती यांच्याकडे आहेत. त्यांच्या या तिकीटं जमा करण्याच्या छंदामुळे त्यांना सिनेमा टीसी म्हणूनही ओळखलं जातं.