Cold Wave Alert in Delhi : राजधानी दिल्ली कडाक्याच्या थंडीने गारठली आहे. (Weather Forecast) सध्या दिल्लीत तापमान 3 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. या हवामानामुळे दिल्लीत दाट धुके पसरले होते. त्यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही झाला आहे. ( Weather News ) पुढच्या काही दिवसात गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कडाक्याच्या थंडीने अनेक लोकांचे बळी घेतले आहेत. उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एका दिवसाच्या आत हार्ट आणि ब्रेन अ‍टॅकने 25 जणांचा मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दिल्लीत आतापर्यंत थंडीमुळे 106 जणांचा मृत्यू झाला असून त्यात सहा महिलांचा समावेश आहे. तसा दावा सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट (CHD) या स्वयंसेवी संस्थेने केला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक लोकांकडे स्वतःचे घर नव्हते अशी माहिती पुढे आलेय. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना CHDने पत्र लिहून आवाहन केले आहे की, अशा बेघर लोकांना थंडीपासून वाचवण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी.


थंडीचा कडाका वाढला, हृदयविकाराचा धोका 


उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे अनेकांचा मृत्यू झालाय. कानपूरमध्येही थंडीची लाट वाढली आहे. थंडीमुळे हृदयविकारांची समस्या वाढत आहे. काल गुरुवारीच 723 रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात आले होते. त्यापैकी 40 हून अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने दाखल करण्यात आले. 


दरम्यान, 723 पैकी 39 रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागली. एका रुग्णाची अँजिओग्राफी करण्यात आली. तर 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासह संपूर्ण शहरात हृदय विकाराच्या आणि मेंदूच्या झटक्याने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 25 वर पोहोचली आहे. यापैकी 17 रुग्णांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यांना चक्कर आल्यासारखे वाटत होते.


तज्ज्ञांच्या मते, जानेवारी महिन्यातील कडाक्याची थंडी लोकांच्या आरोग्यावर परिमाण करत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास जाणवत आहे. थंडीत रक्तदाब अचानक वाढल्याने रक्त गोठणे म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गुठळ्या होतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळेच हृदयविकाराचा झटका आणि मेंदूचा झटका येत आहे. 


थंडीमध्ये अशी घ्या काळजी, डॉक्टरांनी दिल्ला सल्ला


हृदयरोग विभागाचे संचालक प्रोफेसर विनय कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे की, थंडीच्या लाटेत रुग्णांनी थंडीपासून संरक्षण केले पाहिजे. गरज असेल तेव्हाच बाहेर पडा. कान, नाक आणि डोके गरम कपड्याने झाकूनच बाहेर जा. त्याचवेळी, डॉक्टरांनी 60 वर्षांवरील लोकांना थंडीच्या लाटेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.


रात्री हलका आहार घ्या


तसेच हृदयविकाराचा त्रास असलेल्या लोकांनी रात्री हलका आहार घेतला पाहिजे. कारण रात्री जेव्हा थंडी वाढते तेव्हा हृदयापर्यंत रक्त कमी प्रमाणात पोहोचते. कारण रक्त आतड्यांपर्यंत पोहोचते, त्यामुळे हलके अन्न खावे. जेणेकरुन जास्तीत जास्त रक्त हृदयापर्यंत पोहोचेल. 


थंडीत का झाली वाढ?


उत्तराखंडच्या काही भागात बर्फवृष्टी झाल्यानंतर तेथून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळे मैदानी भागात थंडी वाढली आहे. शुक्रवारपासून काही बदल होण्याची शक्यता असली तरी पुढील तीन-चार दिवस कडाक्याच्या थंडीपासून फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. गेल्या 24 तासांत, उत्तर प्रदेशाच्या अनेक भागात अनेक ठिकाणी धुक्याचा दाट चादर दिसून येत आहे. बहुतेक पश्चिम आणि काही पूर्व भागात थंडीची लाट कायम आहे.