`या` दिवशी दिसणार २०२० मधील Cold Moon Night
या वर्षातील शेवटची पौर्णिमा
मुंबई : (Cold Moon Night)२०२० हे वर्ष लवकरच संपणार आहे. या वर्षातील अखेरचा कोल्ड मून लवकरच दिसणार आहे. वर्षातील शेवटच्या पौर्णिमेला कोल्ड मून म्हटलं जातं. याला अमेरिकेत 'लाँग नाइ्ट्स मून' (Long Night Moon) देखील म्हटलं जातं. कारण हा दिवस थंडीच्या संक्रांतीजवळ असते. महत्वाचं म्हणजे ही रात्री या वर्षातील सर्वांत लांब आणि थंडी रात्र असणार आहे.
कोल्ड मून हे कायमच ख्रिसमसनंतर असते. काही दिवसांपू्र्वीच ख्रिसमसवर स्कायवॉचर्स (Skywatchers)ने गुरू (Jupiter) आणि शनि (Saturn) या ग्रहांना एकमेकांजवळ पाहिलं होतं. हा अतिशय अद्भुत नजारा होता. यानंतर आता कोल्ड मून दिसणार आहे. यामुळे खगोल प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
'कोल्ड मून' २०२० वेळ आणि दिनांक
कोल्ड मून (Cold Moon) २०२० मधील ही १३ वी आणि शेवटची पौर्णिमा असून ही दोन दिवसांसाठी दिसणार आहे. कोल्ड मून २९ आणि ३० डिसेंबरच्या रात्री आकाशात दिसणार आहे. भारतात हे नयनरम्य चित्र ३० डिसेंबर रोजी दिसणार आहे. हे पाहण्यासाठी योग्य वेळ असेल रात्रीची ९. उत्तर अमेरिकेत ही पौर्णिमा २९ डिसेंबर रोजी दिसणार आहे.
का म्हटलं जातं 'कोल्ड मून'?
अमेरिकन ट्राईब्सच्या नावावरून किंवा ऋतूमधील बदलानुसार प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या चंद्राला काही विशिष्ट नाव देण्याची पद्धत आहे. डिसेंबर महिन्यात वातावरणात पूर्वीच्या दिवसांच्या तुलनेत थंडावा असल्याने या चंद्राला कोल्ड मून म्हणण्याची पद्धत आहे