Unnao case : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. मात्र काही वेळात पीडित मुलीचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी एका तरूणाला या प्रकरणी अटक केली आहे. तरूणाने एनर्जी वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्या आणि हे कृत्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं? 
पीडित तरूणी कॉलेजच्या द्वितीय वर्षाला होती, एक दिवस घरी एकटीच होती. नराधमाने एनर्जी कॅप्सूल घेतल्या होत्या, पीडित घरी 
एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी घरात शिरला आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. यादरम्यान पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाल्याने जास्त रक्तस्त्राव झाला आणि तेच त्याच्या मृत्यूचं कारण बनलं. 


नराधम लांडग्याने घेतलेल्या गोळ्यांनी पीडितेला जीव गमवावा लागला. पीडिता बेशुद्ध अवस्थेत पडली होती. ज्यावेळी तिची लहान बहिण घरी येते तेव्हा तिला मोठी बहिण दिसते. बहिणीला पाहून आक्रोश करते तेव्हा आजूबाजूचे लोक गोळा होतात. पीडितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात मात्र रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झालेला असतो.


दरम्यान, पोलिसांनी आरोपी राज गौतम याला अटक केली आहे. चौकशीवेळी त्याने आपला गुन्हा मंजूर केला आहे. एनर्जीच्या गोळ्या खावून आरोपीने मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. पीडित बेशुद्ध होताच तिथून पळ काढला.