इलाहाबाद : साप या प्राण्याचीच अनेकांना भीती वाटते. अंगावर काटा येतो, किळस येते. नुसतेच नाव उच्चारताच असे होत असल्यास समोर पाहील्यावर काय होईल? 


काय झाले नेमके ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक प्रकार इलाहाबाद येथील कॉलेजमध्ये घडला. कॉलेजमध्ये चक्क १२ फुट लांब अजगर आढळला. ते पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली असली तरी त्यातून एका प्रोफेसरच्या बहादुरीचे प्रदर्शन झाले. १२ फुट लांब आणि ४० किलोच्या या अजगराला पकडण्यासाठी प्रोफेसरांना खूप मेहनत घ्यावी लागली.


ही घटना इलाहाबादमधील श्यामा प्रसाद मुखर्जी कॉलेजमध्ये घडली. कॅम्पसमध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी फिरत असताना अचानक १२ फूटांचा अजगर त्यांना दिसला आणि विद्यार्थ्यांनी आरडा-ओरड करण्यास सुरूवात केली. ही माहिती तेथे उपस्थित प्रोफेसर एनबी सिंग यांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खूप प्रयत्नांनी अजगराला पकडले व वन विभागाकडे सोपवले.


काय म्हणाले प्रोफेसर ?


याबद्दल प्रोफेसर एनबी सिंग यांनी सांगितले की, ''अजगर रागात असल्याने त्याला पकडण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला.'' हे प्रोफेसर साप पकडण्यात माहीर आहेत आणि त्यांच्या परिसरात त्यासाठी ओळखलेही जातात. यापुर्वी त्यांनी अनेक भयंकर सापांना पकडले आहे. 


सापाला जोपर्यंत तुम्ही त्रास देत नाही तोपर्यंत मुद्दाम तो कोणालाही नुकसान पोहचवत नाही, असे एनबी सिंग यांनी सांगितले.