COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : युक्रेन-रशिया युद्धामुळे पेट्रोलियमच्य किंमती वाढतच आहेत. त्यामध्ये आता कमर्शियल सिलिंडर भाववाढीची भर पडली आहे. 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. सिलिंडरच्या दरात 105 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. 


5 किलो सिलेंडरच्या दरातही वाढ


वाढीमुळे मंगळवारपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यवसायिक सिलेंडरची किंमत 2,012 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर 5 किलोच्या सिलिंडरच्या दरातही 27 रुपयांची वाढ झाली आहे. आता दिल्लीत 5 किलोच्या सिलेंडरची किंमत 569 रुपये असेल.


घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर जैसे थे


सध्या कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 102 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 170 रुपयांनी वाढ झाली आहे. .