LPG Cylinders Hike: देशातील सत्ताधाऱ्यांकडून आगामी काळातील निवडणुकांचं सत्र पाहता सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत आहेत. याच सरकारनं मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना महागाईचा दणका दिला आहे. फेब्रुवारीप्रमाणं मार्च महिन्यातही सरकारनं एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Commercial LPG Cylinder) व्यावसायिक सिलेंडरच्या दरात केंद्राकडून 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय विमानाच्या इंधनांमध्येही वाढ करण्याचा निर्णय सरकारी तेल उत्पादन कंपन्यांनी घेतला आहे. 


हेसुद्धा वाचा : Weather News : दक्षिण मुंबईत पावसाची हजेरी; राज्याच्या 'या' भागात पुढील दोन दिवस पावसाचे 


फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात झालेली वाढ सर्वाधिक म्हटली जात आहे. फेब्रुवारीमध्ये 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 14 रुपयांनी वाढले होते. त्याआधी जानेवारी महिन्यात हे दर 1.50  रुपयांनी वाढले होते. मार्चमध्ये मात्र या दरवाढीनं उसळी घेतली असून, आता या किमती 25.50 रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. ज्यामुळं आता या वाढीसह गॅस सिलेंडरचे दर दिल्लीमध्ये 1795 रुपये, कोलकाता येथे 1911 रुपये आणि मुंबईमध्ये 1749 रुपये तर, चेन्नईमध्ये 1960 रुपये इतक्यावर पोहोचल्या आहेत. 


घरगुती सिलेंडरचे दर स्थिर 


व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढलेले असतानाच त्याचे परिणाम आता हॉटेलमधील पदार्थांच्या दरवाढीच्या रुपात दिसून येणार आहेत. पण, तूर्तास इंधन कंपन्यांकडून घरगुती वापरातील सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. थोडक्यात हे दर स्थिर आहेत त्यामुळं हा काहीसा दिलासा ठरत आहे. 


हवाई इंधनातही दरवाढ... 


तेल कंपन्यांनी मार्च महिन्यासाठी हवाई इंधनाचे दरही वाढल्याचं स्पष्ट केलं आहे. या दरांमध्ये 624.37 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हवाई इंधनामध्ये सातत्यानं कपात केली जात होती, पण आता मात्र या सत्राला ब्रेक लागला आहे. ही दरवाढ मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून लागू करण्यात आली आहे.