हैलाकांडी : आसामच्या हैलाकांडी जिल्ह्यात उसळलेल्या सांप्रदायिक हिंसेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर १४ जण जखमी झाले. शुक्रवारी ही घटना घडलीय. त्यानंतर हैलाकांडी शहरात कर्फ्यु लावण्यात आलाय. या ठिकाणी शांति कायम राखण्यासाठी सेनेला बोलावणं भाग पडलं. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. उपायुक्त कीर्ति जल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्फ्यु जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी ६.०० वाजल्यानंतर ते १२ मे सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत लावण्यात आलाय. काही समुहांनी हिंसा भडकावण्याचा प्रयत्न केला. जीवितहानी आणि संपत्तीचं नुकसान करण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. 


आसाममध्ये हिंसाचार

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी पहिल्या गोंधळानंतर आणि हिेंसेनंतर हैलाकांडी नगरमध्ये दुपारी १.०० वाजल्यापासून अनिश्चित काळापर्यंत कर्फ्यु लावण्यात आला होता. 


आसाममध्ये हिंसाचार

 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनानं दोन समुदायांच्या सदस्यांमध्ये झालेल्या हिेंसेनंतर सेनेच्या मदतीची मागणी केली होती. समुदायांत एका मशिदीसमोर रस्त्यावर नमाज पढण्यावरून वाद उफाळला. 



या हिंसाचारात जवळापस १५ जण जखमी झाले. त्यातील तिघांची अवस्था गंभीर होती. शहारात १५ हून अधिक वाहनांची जाळपोळ आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जखमी व्यक्तीचा सिलचर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालायात रात्री उशिरा मृत्यू झाला.