नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात काँग्रेस बाजी मारली. त्यानंतर समाजवादी पार्टीने आपली उमेदवार यादी जाहीर केली. अद्याप भाजपची यादी जाहीर झालेली नाही. उमेदवारीवर जोरदार खळ सुरु आहे. दरम्यान, त्याआधी आज भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (मार्क्सवादी) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे.



महाराष्ट्रातून कम्युनिष्ट एक जागा लढविणार आहे. दिंडोरी येथून उमेदवार जाहीर केला आहे. मध्य प्रदेशमधून एका जागेवर तर आसाममध्ये दोन, हरियाणात हिस्सारसाठी एक, हिमाचलमधील मंडी, पंजाबमध्ये एक, तामिळनाडूत दोन, त्रिपुरात दोन, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एकूण 16 उमेदवार जाहीर केले आहेत.