तीन महिने फ्री इंटरनेट सेवा देते `ही` कंपनी
ही कंपनी एकूण १३ शहरांमध्ये सुपर फास्ट इंटरनेट सेवा प्रदान करते.
मुंबई : कोरोना काळात अनलॉकच्या माध्यमातून अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु अद्यापही काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घर बसून काम करण्याची सुविधा कायम ठेवली आहे. त्यात आता Excitel या कंपनीने ग्रहकांसाठी नवीन सेवा बाजारात आणली आहे. Excitel ही एक इंटरनेट सर्विस प्रोवायडर कंपनी आहे. त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या संधीचा फायदा घेवू शकता. तुम्हाला या प्लानमध्ये कमीत-कमी 100mbps ची स्पीड मिळणार आहे.
Excitel कंपनी 100mbps ते 300mbps अशी सुपर फास्ट स्पीड देण्यासाठी प्रसिद्ध आहे. Excitel कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार कंपनीने नवीन आणि विद्यमान सर्व ग्राहकांसाठी ही नवीन ऑफर आणली आहे. या योजनेंतर्गत 6 महिन्यांचा इंटरनेट प्लान खरेदी केल्यानंतर 3 महिन्यांसाठी कंपनी ग्राहकांना विनामुल्य इंटरनेट सेवा देणार आहे.
म्हणजे ६ महिन्यांचे पैसे दिल्यानंतर ग्राहकांना ९ महिने फास्ट इंटरनेट सेवेचा फायदा घेता येणार आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार तीन महिन्यांसाठी फ्री इंटरनेट सेवेचा फायदा सध्या फक्त चार शहरांमधील नागरिकांना घेता येणार आहे. या चार शहरांमध्ये दिल्ली-एनसीआर, जयपूर, लखनऊ आणि झांसी यांचा समावेश आहे. ही कंपनी एकूण १३ शहरांमध्ये सुपर फास्ट इंटरनेट सेवा प्रदान करते.