Year Ender 2023 : कंडोम, मखाना व कांदा..! 2023 मध्ये भारतीयांनी स्विगीकडून सर्वाधिक काय ऑर्डर केलं?
Swiggy 2023 Report : 2023 ला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे. अशात या वर्षी भारतीयांनी स्विगीकडून सर्वाधिक काय ऑर्डर केलं याची पोलखोल केली आहे.
Swiggy 2023 Report Year Ender 2023 : 2023 या वर्षाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे हे वर्ष कसं गेलं, कुठल्या घडामोडी घडल्या, काय काय झालं याचा धावता आढावा प्रत्येक जण करतोय. हे वर्ष कसं गेलं आणि नवीन वर्षात कुठल्या संकल्प करायचा याचा विचार इथे भारतीय करत आहेत. 2023 मध्ये भारतीयांनी जेवण्यात सर्वाधिक पसंती ही बिर्याणीला दिली आहे. सलग 8 व्यांदा बिर्याणी भारतीयांची पहिली आवड ठरली आहे. आता स्विगीने त्याचे 'स्विगी इंस्टामार्ट क्विक कॉमर्स ट्रेंड्स 2023' रिलीज करुन भारतीयांची पोलखोल केली आहे. (Condom makhana and onion What did Indians order the most from Swiggy in 2023)
स्विगीकडून सर्वाधिक काय ऑर्डर केलं?
2023 या वर्षात भारतीयांनी स्विगी इंस्टामार्टमधून सर्वाधिक काय खरेदी केलं याच गुपित उघड केलं आहे. या रिपोर्टनुसार लोकांनी कोणात्या गोष्टींमध्ये अधिक रस दाखवला हे समोर आलं आहे. यावर्षी भारतीयांना कंडोमपासून ते मखानापर्यंत सर्व काही विक्रमी वेळेत लोकांच्या घरी पोहोचवलंय. स्विगी ही भारतातील 28 शहरांतील लोकांना 15 ते 20 मिनिटांत वस्तू घरपोच देण्याचं काम करते. आता आपण स्विगी इंस्टामार्टचा 2023 चा अहवालात भारतीयांची काय पोलखोल केली आहे ते पाहूयात.
या रिपोर्टनुसार चेन्नईतील एका व्यक्तीने 31,748 रुपयांची सर्वात मोठी ऑर्डर यावर्षी दिली होती. या व्यक्तीने कॉफी, ज्यूस, कुकीज, नाचोस आणि चिप्सची सर्वाधिक ऑर्डर दिली होती. त्यानंतर जयपूरच्या एका व्यक्तीने एकाच दिवसात 67 ऑर्डर देऊन विक्रम केल्याचा स्विगीच्या रिपोर्टवरुन समोर आलं आहे. तर दिल्लीतील एका दुकानदाराने 12,87,920 रुपयांच्या वार्षिक किराणा मालावर 1,70,102 रुपयांची बतच केली आहे. तर सप्टेंबरची तुलना व्हॅलेंटाईन महिन्याशी केली तर बहुतेक कंडोम फेब्रुवारीत नव्हे तर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक विकले गेले.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 12 ऑगस्ट 2023 ला सर्वाधिक 5893 कंडोमची विक्री करण्यात आली आहे. याशिवाय कांदा, केळी, चिप्स, रंगकाम आदी वस्तूही मोठ्या प्रमाणात स्विगीवरुन ऑर्डर करण्यात आल्या आहेत. एकंदरीत स्विगीच्या ऑर्डरबद्दलच्या अहवालावर नजर टाकल्यास यावर्षी भारतीयांनी आरोग्याबाबत विशेष जागरूकता दाखवली असं दिसून आलं आहे.
तर खाद्यपदार्थांमध्ये मखानाने बाजी मारली आहे. मखानासाठी 1.3 दशलक्षाहून अधिक ऑर्डर स्विगीने या वर्षी घरपोच केले आहेत. फळांबद्दल बोलायचं झालं तर फळांच्या राजा आंबा अव्वल ठरला आहे. विशेष म्हणजे बेंगळुरूकरांनी आंबा खरेदीसाठी मुंबई आणि हैदराबादला मागे टाकलं आहे. देशभरात आंब्याची सर्वाधिक डिलिव्हरी ही 21 मे 2023 झाली.