Madhya Pradesh Wedding News: मध्य प्रदेशात लग्न सोहळ्यात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कन्यादान योजने अंतर्गत हा सामूहिक विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी वधुला भेट म्हणून देण्यात आलेल्या मेकअप किटमध्ये हे कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची पाकिटे ठेवण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील झाबुआ येथील दसरा मैदानावर या  सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या  सामूहिक विवाह सोहळ्यात 296 जोडप्यांनी सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या मुख्यमंत्री कन्यादान योजनेअतंगर्त हा विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता. 


विवाह सोहळ्यात नेमकं काय घडलं?


या विवाह सोहळ्यात वधुंना मेकअप किटचे वाटप करण्यात आले. मात्र, जेव्हा सर्वांनी हे मेकअप किट उघडले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. कारण, या मेकअप किटमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची पाकिटे देखील होती. यामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्री शिवराज सिंह देखील यावेळी येथे लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते. 


प्रशासनाचा खुलासा


मुख्यमंत्री कन्यादान योजनेचे नियोजन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. यामुळे वधुंना देण्यात आलेल्या गिफ्टबाबत विचारले असता मेक अप किट मध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची पाकिटे ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाचा असल्याचा असल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे. 


लग्नापूर्वी केली Pregnancy Test


या पूर्वी देखील  मुख्यमंत्री कन्यादान योजने अंतर्गत आयोजीत करण्या आलेले विवाह सोहळे वादात सापडले होते. दिंडोरी येथे झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नापूर्वी 219 वधूंची गर्भलिंग चाचणी करण्यात आली होती. याप्रकारामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.


मेडिकलमधून कंडोम चोरले


मेडिकलमधून कंडोम चोरल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडला होता.  राहुरी तालुक्यातल्या देवळाली प्रवरात मेडिकलमध्ये ही चोरी झाली झाली होती.  चोरांनी अवधूत मेडिकलमधून 50-60 कंडोमची पाकिटं चोरली होती. सोबत 2हजारांच्या  चिल्लरवर देखील चोरट्यांनी डल्ला मारला होता. जवळच असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्सचं कुलुप न तुटल्यानं चोरट्यांचा प्रयत्न फसला. एरवी चोरीत दागदागिने आणि रोकड चोरतात. पण मेडिकलमधल्या कंडोमच्या चोरीची गावात जोरदार चर्चा रंगली होती.