मुंबई : फार्मा सेक्टरमधील मोठी कंपनी मॅनकाइंड फार्मा यावर्षी शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत आहे. मॅनकाइंड फार्माने आपल्या मेगा आयपीओसाठी बँकांशी प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. भारतात सर्वात जास्त विकला जाणारा कंडोम ब्रँड मॅनफोर्स कंडोम्स, प्रेगा न्यूज, कॅलोरी 1 सारखे अनेक मोठे प्रोडक्टचे उत्पादन मॅनफोर्स फार्मा करीत असते.


कंपनीची वॅल्यू 10 अब्ज डॉलर असण्याची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फार्मा इंडस्ट्रीशी संबधीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या आयपीओबाबत प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू आहेत. हा आयपीओ  OFS असू शकतो. ज्यामध्ये कंपनीचे प्रमोटर्स आणि मोठे गुंतवणूकदार आपली हिस्सेदारी विकतील. कमी कालावधीत भारतीय बाजारात मोठा ग्राहकवर्ग जमवलेली कंपनी लवकरच शेअर बाजारातही उतरू शकते.


फार्मा सेक्टरमधील सर्वात मोठा आयपीओ


आयपीओचे वॅल्यूएशनबाबत मध्याप माहिती मिळाली नसली तरी, कंपनीचा टर्नओव्हर पाहता हा आयपीओ फार्मा सेक्टरमधील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो.