चंदिगड: काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकीत कितीही प्रयत्न केले तरी त्यांना जिंकण्याची संधी नाही, असे मत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मांडले. ते शनिवारी चंदिगड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, गेल्या दोन-तीन वर्षांपासून आम्ही सातत्याने सांगत आहोत की, २०१९मध्ये विरोधी पक्षांना जिंकण्याची कोणतीही संधी नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे काँग्रेस आणि इतर विरोधकांनी निवडणुकीसाठी मेहनत जरुर करावी. मात्र, ही मेहनत २०२४ च्या निवडणुकीसाठी असावी. कारण २०१९ मध्ये त्यांना कोणतीच संधी नाही, असे पासवान यांनी म्हटले.


आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून मोदी सरकारविरुद्ध तिसरी आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या आघाडीचे नेतृत्त्व कोण करणार, हा तिढा न सुटल्यामुळे ही आघाडी अजूनही प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही.