गांधीजींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला- उमा भारती
महात्मा गांधींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष विसर्जित करण्यास सांगितले होते असे वक्तव्य भाजपा नेता आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे.
नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष विसर्जित करण्यास सांगितले होते असे वक्तव्य भाजपा नेता आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे.
महात्मा गांधी यांच्या हत्येची पुन्हा चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाच्या निष्कर्षांबाबत त्यांना विचारण्यात आले होते. उत्तर गुजरातमधील बनसंकटा जिल्ह्यातील 'गुजरात गौरव यात्रा' दरम्यान त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. गोडसेंकडून गांधीजींची हत्या झाल्यापासून हे प्रकरण सुरू आहे. आज मी तुम्हाला माध्यम-प्रसारमाध्यमांमार्फत विचारते की गांधीजींच्या हत्येमुळे, कोणाला फायदा मिळाला? संघ आणि जनसंघाचे नुकसान झाले, देशाला तोटा झाला. परंतु गांधीजींच्या हत्येमुळे केवळ काँग्रेसला फायदा झाला". काँग्रेस (स्वातंत्र्य नंतर) विसर्जित करावी असे गांधीजींनी जाहीर केले होते पण कॉंग्रेसने त्याचा भंग केला असे पेयजल आणि स्वच्छता मंत्री यांनी सांगितले.
मुंबईच्या पंकज फडणीस यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन गांधी हत्येची पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली आणि यामधून इतिहासातील अनेक गुपित बाहेर येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. फडणीस हे एक संशोधक असूनअभिनव भारतचा विश्वस्त देखील राहिले आहेत.