BJP targets Rahul Gandhi: खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून (Congress) भारत जोडो यात्रा सुरु करण्यात आली आहे. कन्याकुमारी ते काश्मिर (kanyakumari to kashmir) असा 3 हजार 570 किलोमीटरची ही यात्रा असणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी पायी प्रवास करणार आहेत.  स्वातंत्र्यानंतर भारतातील सर्वात मोठ्या राजकीय चळवळीची ही सुरुवात असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर भाजप  (BJP) आणि आरएसएसने (RSS) निशाणा साधला आहे. यात्रा सुरु झाल्यापासून भाजपने खासदार राहुल गांधी यांना टार्गेट केलं आहे. आता पुन्हा एकदा भाजपने ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. यात्रेत राहुल गांधी यांनी जो टी-शर्ट घातला होता त्याची किंमत तब्बल 41 हजार रुपये असल्याचा दावा भाजपने केला आहे. आपल्या ट्विटमध्ये भाजपने राहुल गांधी यांचा एक तो महागडा टी-शर्ट घातल्याचा फोटो, त्या टी-शर्टचा ब्रँड आणि त्याची किंमत शेअर केली आहे. भाजपने ट्विट केलेल्या फोटोनुसार त्या टी-शर्टची किंमत 41 हजार 257 रुपये इतकी आहे. यासोबत त्यांनी एक कॅप्शन टाकला असून त्यात लिहिलंय 'भारत देखो'


काँग्रेसचं भाजपला प्रत्युत्तर
भाजपने ट्विट केल्यानतंर काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसने एक ट्विट केलं असून त्यात त्यांनी म्हटलंय, भारत जोडो यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून घाबरलात का? मुद्द्यावर बोला... बेरोजगारी, महागाईवर बोला... कपड्यांवरच चर्चा करायची असेल तर मोदींचा 10 लाख रुपयांचा सूट आणि 1.5 लाखांच्या चष्म्यावर बोला, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.



सफेद टी-शर्टमध्ये राहुल गांधी
काँग्रेस कासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेस वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांसोबत भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. पक्षातर्फे राहुल गांधी यांच्यासह  यात्रेत सहभागी झालेल्या119 नेत्यांना 'भारत यात्री' असं संबोधित केलं आहे. यात्रेत राहुल गांधी यांनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. 


पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार या यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांसाठी पांढऱ्या रंगाचा ड्रेसकोड ठरवण्यात आला आहे.