COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाल यांनी त्यांचा उल्लेख औरंगजेब असा केलाय... गेल्या ४८ महिन्यांमध्ये आजचे औरंगजेब असलेल्या मोदींनी आपला पक्ष आणि लोकशाही वेठीला धरल्याची टीका सुरजेवाल यांनी केली... औरंगजेबानं तर फक्त स्वत:च्या वडिलांना बंधक केलं होतं. पण आजचे औरंगजेब मोदींनी स्वत:चा पक्ष आणि देशालाच बंधक बनवलं आहे, असं सुरजेवाल म्हणाले आहेत. दरम्यान रणदीप सुरजेवाला यांनी आणीबाणीचं समर्थन केलं आहे. काँग्रेसचेच नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र आणीबाणीचं समर्थन करणं योग्य नसल्याची भूमिका मांडली. 


'आणीबाणी लोकशाहीला लागलेला कलंक'


आणीबाणीला ४३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपतर्फे मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी घराण्यावर जोरदार हल्लाबोल केला. आणीबाणी म्हणजे लोकशाहीवर लागलेला कलंक असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलंय. आणीबाणीला ४३ वर्ष झाली, तरी काँग्रेस त्या मानसिकतेतून बाहेरच आलेली नसल्याचा आरोप मोदींनी केला. काँग्रेसनं सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग आणणं, निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करणं यासारख्या घटनांमधून हिच मानसिकता पुढे येत असल्याचा टोलाही मोदींनी लगावला.