नवी दिल्ली : १९८४ साली दिल्लीत झालेल्या शीख हत्यांकाड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमारने आज न्यायालया समोर आत्मसमर्पण केले. दिल्ली उच्च न्यायालायनं १७ डिसेंबरला सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, त्यावेळी ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्याची मुदत दिली होती. सज्जन कुमारने मुदत महिन्याभरासाठी वाढवून देण्याची मागणी केली. पण ती मागणी न्यायायलानं फेटाळलीय. त्यामुळे सज्जन कुमारला शरण येण्यावाचून पर्याय नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सज्जन कुमारने मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेटमध्ये अदिती गर्ग यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. हिवाळी सुट्टीच्या कारणानं सर्वोच्च न्यायालय १ जानेवारीपर्यंत बंद आहे. २ जानेवारीपासून न्यायालयाचं कामकाज सुरळीतपणे सुरू होईल.


आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार सज्जन कुमार यांचे वकील अनिल कुमार शर्मा यांनी म्हटलंय. दिल्ली उच्च न्यायालयानं १७ डिसेंबर रोजी ७३ वर्षीय माजी खासदार सज्जन कुमार आजीवन कारावासाची शिक्षा सुनावलीय. तर इतर पाच दोषींना वेगवेगळी कालावधीची शिक्षा ठोठावलीय. या सर्वांना ३१ डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिलेत.


शीखविरोधी हिंसाचार


तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्याच सुरक्षेत तैनात करण्यात आलेल्या दोन शीख अंगरक्षकांकडून गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली आणि देशातील काही इतर राज्यांत शीखविरोधी दंगा उसळल्या होता. यावेळी, दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या पालन कॉलोनीच्या राज नगर पार्ट - १ मध्ये १ आणि २ नोव्हेंबर रोजी पाच शिखांच्या हत्या आणि एक गुरुद्वारा जाळण्यात आलं होतं.