गुजरातमध्ये कॉंग्रेसला अनुकूल वातावरण
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट संध्याकाळी घेतली. यावेळी २३ ऑक्टोबरला गुजरातमध्ये आयोजित रॅलीत राहुल गांधी येणार असल्याचं अल्पेश ठाकोर यांनी सांगितलं. तसंच आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचंही ते म्हणाले.
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट संध्याकाळी घेतली. यावेळी २३ ऑक्टोबरला गुजरातमध्ये आयोजित रॅलीत राहुल गांधी येणार असल्याचं अल्पेश ठाकोर यांनी सांगितलं. तसंच आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचंही ते म्हणाले.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरात दौऱ्यानंतर, काँग्रेससाठी गुजरातमध्ये हळूहळू अनुकूल वातावरण तयार होत आहे. विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन, काँग्रेसनं पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनाही केलं होतं. मात्र हार्दिक पटेल यांनी २० टक्के आरक्षणसंबंधी आश्वासनाचा मुद्दा पुढे करत, आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवणं पसंत केलं.
पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या कॉंग्रेससाठी गुजरात निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. तर, असलेली सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. गेली अनेक वर्षे गुजरात हे भाजपसाठी होम पिच ठरले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुजरातमधूनच येतात. त्यामुळे होम पिचवरच विजयरथ रोखून भाजपला गारद करायचे कॉंग्रेसच स्वप्न आहे. त्यातूनच कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जोर लावला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राहूल गांधी यांनी केलेले दौरे पाहता. त्याला लोकांमधून उत्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे. राहूल गांधी यांना हलवलेला सूर सापडल्यामुळे भाजपच्या गोटातही सतर्कता निर्माण झाली आहे. आपल्याला अॅण्टीइन्कंबन्सीचा फटका बसू नये यासाठी भाजपनेही गुजरातमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हे सर्व चित्र पाहता जनता कोणाला कौल देणार याबाबत उत्सुकता आहे.