रामदेव बाबांवरील ट्विटमुळे दिग्विजयसिंह ट्रोल
आखाडा परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव का नाही?, असा सवाल करत कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. दरम्यान, दिग्विजयसिंह यांच्या ट्विटरव लोकांनी चांगलाच प्रतिनिशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : आखाडा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव का नाही?, असा सवाल करत कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. दरम्यान, दिग्विजयसिंह यांच्या ट्विटवर लोकांनी चांगलाच प्रतिनिशाणा साधला आहे.
दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे, आखाडा परिषदेने रामदेव बाबांचे नाव ढोंगी बाबांच्या यादीत टाकले नाही. गेली अनेक वर्षे रामदेवबाबा लोकांना लूटत आहे. आपल्या ट्विटमध्ये दिग्विजयसिंह म्हणतात, 'सन्माननीय आखाडा परिषदेने रामदेव बाबांचे नाव या यादीत समाविष्ट केले नाही. हे अत्यंत निराशाजनक आहे. संपूर्ण देशाला फसवत आहेत. खोटी गोष्ट खरी म्हणून विकत आहेत', दिग्विजय सिंह यांच्या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रीया आल्या आहेत.
दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधताना काही युजर्सनी राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, काहींनी आचार्य प्रमोद कृष्णन यांनाच ढोंगी बाबा म्हणून जाहीर करा अशी मागणी केली आहे.
दिग्विजय सिंह यांच्या ट्विटला प्रतिक्रीया देणारी ही काही ट्विट्स..
दरम्यान, बाबा राम रहीम बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी आढळल्यावर न्यायालयाने त्याला २० वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर आखाडा परिषदेने एक यादीच जाहीर केली. त्यात ढोंगी बाबांची नावे जाहीर केली असून, यादीतील बाबांचा आखाडा परिषदेसाठी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.