नवी दिल्ली : काँग्रेसजन आपल्याला ठार मारण्याचे स्वप्न बघत असल्याचा दावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेस पक्ष मोदी द्वेषाने इतका पछाडला आहे की त्यांना नरेंद्र मोदींच्या हत्येची स्वप्न पडू लागली आहेत असंही त्यांनी म्हटलंय. मोदी पुढे म्हणाले की सारे देशवासीय त्यांच्या पाठिशी आहेत याचा काँग्रेसला विसर पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसवर तीव्र हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की, काँग्रेस नेते माझा खूप तिरस्कार करतात. त्यांना मला ठार मारण्याची इच्छा आहे. मध्यप्रदेशच्या इटारसी येथे झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी हे धक्कादायक भाष्य केले. काँग्रेसला मला ठार मारण्याची स्वप्न पडत आहेत. दरम्यान, त्याआधी बुधवारी उत्तर प्रदेशमधील एका सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले होते की,  दहशतवादी गट अजूनही पाकिस्तानमध्ये सक्रिय आहेत आणि ते भारतात दहशतवादी हल्ले घडविण्याची संधी पाहत आहेत. 


नुकतेच श्रीलंकेमध्ये काय झाले ते आम्ही पाहिले. २०१४ पूर्वीच्या परिस्थितीप्रमाणे ही परिस्थिती अगदी जवळ आली होती. अयोध्या आणि फैजाबादमध्ये घडलेल्या स्फोटांबद्दल आपण विसरू शकत नाही. काही दिवसात स्फोट घडले किंवा आम्ही कधी विसरू शकत नाही, असे मोदी म्हणालेत.