नवी दिल्ली : लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महागठबंधन तोडत भाजपशी सलगी केली आणि भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. नितीश कुमार यांच्या या खेळीमुळे महागठबंधनमध्ये असलेली आरजेडी आणि काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली गेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेतून बाहेर फेकली गेल्यामुळे काँग्रेसची आणखी एका राज्यातून सत्ता गेली आहे. यामुळे आता फक्त सहा राज्यांमध्येच काँग्रेसची सत्ता आहे. तर भाजप मात्र १८ राज्यांमध्ये सत्तेत आहे.


पंजाब, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पुदूच्चेरी, मेघालय आणि मिझोराम या सहा राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता राहिली आहे. यातल्या हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक सारख्या मोठ्या राज्यांमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. हिमाचल प्रदेशची निवडणूक यावर्षी होईल तर कर्नाटकची निवडणूक पुढच्या वर्षी होईल.