नवी दिल्ली : Navjot Singh Sidhu :पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये उलथापालथ झाली आहे. पंजाब काँग्रेस अध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धूच कायम आहेत. दरम्यान, पंजाबच्या राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ते काँग्रेससाठी धोक्याचे ठरणार आहे. (Congress high command rejects Navjot Singh Sidhu's resignation, asks state leadership to resolve matter )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी कॅप्टन अमरिंदर सिंह यांची बैठक झाली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते. नवज्योतसिंह सिद्धू यांचा राजीनामा आणि पंजाबमधील नवीन मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर कॅप्टन मंगळवारी दिल्लीला पोहोचले. यासोबतच त्यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट घेतल्याने आता ते भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.


पंजाब प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा नवज्योतसिंह सिद्धू यांनी दिल्यानंतर (Navjot Singh Sidhu’s resignation) राज्यातील एका मंत्र्यांनेही राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाली असताना पंजाब काँग्रेस अध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धूच राहतील, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सिद्धू यांचा राजीनामा फेटाळला लावला आहे.


सिद्धू यांची मनधरणी करण्याची जबाबदारी नव्या मुख्यमंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे. हायकमांडने मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांना ही जबाबदारी सोपवली आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे. अमरिंदर सिंह यांना केंद्रीय कृषी मंत्री केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.