नवी दिल्ली : ३३ व्या मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा दिला. लोकशाहीवर प्रेम करणारे भारतीय आणीबाणीची ती काळरात्र विसरु शकणार नाहीत असं मोदी म्हणाले. २५ जून १९७५ च्या त्या रात्री संपूर्ण देश तुरुंगात बदलून गेला होता आणि विरोधकांचा आवाज दाबला जात होता असं मोदी म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदींच्या या टीकेवर काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. आणीबाणी ही चूक होती हे आम्ही मान्य केलं आहे. पण सध्या देशामध्ये अघोषित आणीबाणी लागली आहे. जुन्या गोष्टींपासून मोदी काही शिकले नाहीत तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असं काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन म्हणालेत.