Navratri 2024 : नवरात्रीत 'या' 13 चुका करु नका! माता दुर्गा होईल नाराज

Navratri 2024 : नवरात्रीमध्ये 9 दिवस काही नियम सांगण्यात आलंय. नवरात्रीत नऊ दिवस कडक उपवास करतात. दुर्गा मातेची पूजा करताना पुढील नऊ दिवस 'या' 13 चुका करु नका, अन्यथा माता दुर्गा नाराज होईल, असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Oct 02, 2024, 17:07 PM IST
1/13

नवरात्रीचं व्रत पाळणाऱ्यांनी दाढी, मिशा किंवा केस कापू नयेत. 

2/13

नवरात्रीतील नऊ दिवस नखे कापू नयेत.

3/13

जर तुम्ही अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसात घर रिकामे ठेवू नका.

4/13

जेवणात कांदा, लसूण आणि मांसाहार करू नका. 

5/13

नऊ दिवस उपवास करणाऱ्यांनी घाणेरडे आणि न धुलेले कपडे घालू नयेत. 

6/13

व्रत पाळणाऱ्या लोकांनी बेल्ट, चप्पल, शूज, बॅग अशा चामड्याच्या वस्तू वापरू नयेत. 

7/13

व्रत करणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू तोडू नये.

8/13

उपवासात नऊ दिवस अन्नात धान्य आणि मीठाचे सेवन करू नये. 

9/13

विष्णु पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपणे वर्ज्य आहे.

10/13

चालीसा, मंत्र किंवा सप्तशती वाचत असाल तर वाचताना बोलण्याची किंवा उठण्याची चूक करू नका. यामुळे नकारात्मक शक्ती पाठाचे निकाल काढून घेतात. 

11/13

अनेक लोक तंबाखू चघळतात, उपवासाच्या वेळी ही चूक करू नका. व्यसनामुळे उपवास मोडतो. 

12/13

नवरात्रीत एका ठिकाणी बसून फळांचं सेवन करावं. 

13/13

शारीरिक संबंध ठेवल्याने व्रताचे फळ मिळत नाही. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)