कर्नाटकात राजकीय घडामोडी, काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन
भाजपचे नेते बी एस येडियुरप्पांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन केले.
बंगळुरु : भाजपचे नेते बी एस येडियुरप्पांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन केले. कर्नाटकात भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलरच्या नेत्यांकडून विधिमंडळाच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. राज्यपालांनी ज्यांचे बहुमत होते, त्यांना सरकार स्थापनेसाठी संधी देण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे न केल्याने काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन केले.
कर्नाटकात त्रिशंकू स्थिती आहे. असे असताना बुधवारी रात्री राज्यपाल वजूभाई वाला यांना अखेर भाजपला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. याविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी सोहळ्याला स्थगिती देण्यास नकार दिला. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बी एस येडियुरप्पा हे तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.
धरणे आंदोलनाच्यावेळी काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद, अशोक गेहलोत, मल्लिकार्जून खरगे आदी नेते या प्रसंगी उपस्थित होते. रिसोर्टवर थांबलेले दोन्ही पक्षांचे आमदारही धरणे आंदोलनात सहभागी झाले.
सत्तास्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे.आता आम्ही जनतसमोर जाऊन भाजपने लोकशाहीविरोधी कृत्य कसे केले हे सांगू, असे काँग्रेसचे नेते सिद्धरामैया यांनी सांगितले.