बंगळुरु : कर्नाटकातल्या काँग्रेस जनता दलाच्या सरकारवर संकट ओढवले आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे १३ आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली असून राजकीय घडामोडीवर लक्ष केंद्रीत केले आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातल्या काँग्रेस जनता दल यांच्या सरकारवर संकट घोंघावतंय. काँग्रेस आणि जेडीएसचे १३ आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात हे १३ आमदार जमा झाल्याचे वृत्त आहे. मात्र दालनात विधानसभा अध्यक्ष उपस्थित नाही. काँग्रेसचे १० आणि जेडीएसचे ३ आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी बंगळुरूत काँग्रेस आमदार आणि नगरसेवकांती तातडीने बैठक बोलावली आहे.