प्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिल्लीतील बंगला केला खाली, त्याचवेळी मोठा निर्णय घेतला...
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला खाली केला.
मुंबई : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला खाली केला. त्या उत्तर प्रदेशात राहायला जाणार आहेत. मात्र, सद्या त्या दिल्लीतच राहणार आहेत. त्यांनी मध्य दिल्लीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोणतीही पुढे डोकेदुखी ठरु नये म्हणून त्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. बंगला रिकामा केल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्यासमोर सर्वकाही तपासण्यासाठी पाठवले. नंतर नवीन वाद किंवा आरोप होऊ नये, म्हणून त्यांनी स्पष्ट केले. पाहा सर्व काही बसवलेले बंगल्यातच सोडून जात आहे, असे प्रियंका गांधी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
प्रियंका गांधी-वाड्रा या आता गुरुग्राममध्ये काही दिवस राहणार आहेत. त्यानंतर मध्य दिल्ली भागातील निवासस्थानात शिफ्ट होणार आहेत. प्रियंका यांनी आपल्या मध्य दिल्लीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या घराचं रंगकाम आणि दुरुस्ती सुरू आहे, अशी माहिती प्रियांका गांधी यांच्याशी संबंधित सूत्रांनी दिली, अशी माहिती एएनआयने आपल्या वृत्तात दिली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सरकारी बंगला सोडल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. हा वाद डोळ्यासमोर डोळ्यासमोर प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सर्व काळजी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या सोबत प्रियंका गांधी-वाड्रा गुरुवारी लोधी इस्टेट या बंगल्यात आल्या. यावेळचा व्हिडिओ समोर आला आहे. 'आपण बंगल्यात जे काही बसवले आहे ते सर्व इथेच सोडत आहे. हे इथेच स्पष्ट करुन सांगते. हे सगळे तुम्ही पाहून घ्या. मी गेल्यानंतर काहीही गडबड नको आहे, असे प्रियंका यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले. एसपीजी सुरक्षा काढून घेतल्यानंतर प्रियंका यांना बंगला रिकामा करावा लागला आहे.