सहारनपूर : जिल्हा प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही राहुल गांधी रोड मार्गानं सहारनपूरकडे निघाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी दुपारी उत्तर प्रदेश-हरियाणा बॉर्डर स्थित सरसावा इथं दाखल झाले. इथं त्यांनी काही पीडित कुटुंबांची भेट घेतली. या दरम्यान त्यांच्यासोबत काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद आणि यूपी काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर हेदेखील उपस्थित होते. 

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर हवाई मार्गानं न जाता राहुल गांधी गाडीनं सहारनपूरच्या शब्बीरपूर गावाकडे निघाले. जिल्हा प्रशासनानं राहुल याच्या हेलिकॉप्टरला सहारनपूरमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली होती. 


सहारनपूरच्या सीमेवर प्रवेश करताना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जतही घातली. प्रशासनाचं राहुल यांच्या या दौऱ्यावर लक्ष होतंच त्यामुळे त्यांनी मोठ्या संख्येत पोलीस तैनात केले होते.