Rahul Gandhi On ED Raid: कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत तुफानी भाषण केले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. हे स्पष्ट करताना त्यांनी महाभारतातील उदाहरण देत चक्रव्यूहचा उल्लेखदेखील केला होता.दरम्यान यावरुन आता राजकारण चांगलंच पेटताना दिसतंय. कारण आपले संसदेतील चक्रव्यूह भाषण दोघांपैकी एकाला आवडले नाही. त्यामुळे माझ्या घरावर ईडीची धाड पडणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलाय. ईडी माझ्या घरावर छापा टाकणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या एक्स प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक ट्वीट केलं त्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडालीय.  संसदेत चक्रव्युहच्या संदर्भात केलेले भाषण दोनपैकी एकाला आवडलं नाही म्हणून माझ्या घरावर इडी छापा टाकणार असल्याचा दावा केला आहे.


मी त्यांच्या स्वागतासाठी तयार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे, 'मी त्यांना चहा-बिस्किटे खायला देईन... मी वाट पाहतोय', असेही त्यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांनी संसदेत चक्रव्यूह संदर्भात भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सह सरसंघचालक मोहन भागवत, अजीत डोभाल, अंबानी आणि अडानी वर टीका केली होती..


राहुल गांधींची पोस्ट



काय म्हणाले संजय राऊत? 


राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. ते गेल्या एक महिन्यापासून सरकारला आरसा दाखवतात. मोदी शहांना सळो की पळो करुन सोडतायत. त्यामुळे त्यांच्यावर ते कारवाईदेखील करतील. हे सरकार अल्पमता आलंय तरीही ते असं वागणं सोडत नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केलाय. 


संसदेतील भाषणात काय म्हणाले होते राहुल गांधी?


देशाला चक्रव्युहात अडकवंल जातंय, याचा आकार कमळासारखा आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. संसदेतील आपल्या भाषणात त्यांनी अग्नीवर, शैक्षणिक बजेट अशा विविध मुद्द्यांवरुन भाजपवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाभारताचा संदर्भ दिला. चक्रव्युहचं दुसरं नाव पद्मव्युह असे असल्याचे मला संशोधनातू कळाले. पद्मव्युह हे कमळ फुलाच्या आकाराचे असते. ज्याचे चिन्ह पंतप्रधान आपल्या छातीवर घेऊन फिरतात. ज्याप्रमाणे अभिमन्यूला चक्रव्युहात फसवण्यात आलं होतं, ज्याप्रमाणे भारतातील तरुण, शेतकरी, आई-बहिणींना फसवलं जात असल्याची टीका राहुल गांधींनी आपल्या भाषणातून केली. ही भीती इतक्या वेगाने का पसरतेय? भाजपमधील माझे मित्र, शेतकरी, कार्यकर्ता आणि तरुण सर्वच घाबरले आहेत. हजारो वर्षांपुर्वी कुरुक्षेत्रावर अभिमन्यूला 6 लोकांनी चक्रव्युहात फसवून मारलं. चक्रव्युहाच्या आत भीती असते, हिंसा असते आणि अभिमन्यूला चक्रव्युहात फसवून 6 लोकांनी मारले. द्राणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वत्थमा आणि शकुनी यांनी अभिमन्यूला घेरलं. केंद्र सरकारदेखील नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोभाल,अंबानी आणि अदानी हे लोकं कंट्रोल करतात, असे आरोप राहुल गांधींनी केला.