नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव (Congress Leader Rajiv Satav) आणि भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया (BJP Leader Jyotiraditya Scindia) यांच्यात राज्यसभेत जोरदार खडाजंगी झाली. ज्योतिरादित्य सिंधिया राज्यसभेत बोलत असतानाच राजीव सातवांनी 15 लाख कुठे गेले, असा सवाल केला. त्यावर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माझं तोंड उघडायला लावू नका म्हणत महाविकास आघाडी सरकारने वसूली केलेल्या 100 कोटींचा हिशोब मागितला. ज्योतिरादित्य यांनी राजीव सातव आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेत सुनावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक गाडी आणि त्यात स्फोटक सापडली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले या प्रकरणी सचिन वाझे यांना अटक झाली तर दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमवीर सिंग यांनी उचलबांगडी झाली. परमवीर सिंग यांची बदली झाल्यावर नाराज परमवीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिले. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना 100 कोटींचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपनंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला.  हा प्रश्न राज्यसभेत उपस्थित झाला आहे.



मोदी सरकार सत्तेत आले तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्यात येतील, असे सांगितले जात होते. आता ते 15 लाख कुठे गेलेत, असे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी खासदार ज्योतिरादित्य हेही अधिक आक्रमक झालेत. त्यांनी आधी 100 कोटीचे काय झाले, ते सांगा म्हणत. मला जास्त तोंड उघडायला लावू नका, असे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले.