नवी दिल्ली : काँग्रेस नेते रोशन बेग लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. सोमवारी त्यांनी काँग्रेसवर मुस्लिमांना डावलल्याचा आरोप करत पक्षावर नाराजी व्यक्त केलीय. 'कर्नाटकात काँग्रेसनं ख्रिश्चनांना एकही जागा दिली नाही तर मुस्लिमांना केवळ एका जागेवर तिकीट दिलं. मुस्लिमांना डावलण्यात आलं. यामुळे मी चिंतीत आहे. पक्षानं आमचा केवळ वापर केलाय' असं त्यांनी म्हटलंय. यावेळी, येत्या काही दिवसांत तुम्ही काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का? या प्रश्नावर 'गरज पडली तर अवश्य असं होईल' असं उत्तर बेग यांनी दिलंय.


रोशन बेग

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी जाहीर झालेल्या अनेक एक्झिट पोलच्या आकड्यांत काँग्रेसला झटका लागणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय. त्यानंतर रोशन बेग यांनी सोमवारीच काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना हवा दिली. एनडीए पुन्हा सत्तेत आले तर परिस्थितीशी जुळवून घेत भाजपा आणि एनडीएशी हातमिळवणी करण्याचा सल्लाही त्यांनी मुस्लिमांना दिला होता. आपण कोणत्याही एका पक्षासाठी बांधिल राहू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.