नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने भारतात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. काँग्रेस नेते आणि प्रवक्ते संजय झा यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द संजय झा यांनी ट्विट करून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. संजय झा यांना कोरोना झाला असला तरी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीयेत.



'माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीयेत, त्यामुळे पुढचे १०-१२ दिवस मी घरातच क्वारंटाईनमध्ये राहणार आहे. कृपया एकमेकांना संक्रमण व्हायच्या धोक्याला कमी लेखू नका. आपण सगळेच असुरक्षित आहोत. स्वत:ची काळजी घ्या,' असं ट्विट संजय झा यांनी केलं आहे.