नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजघाटावर बापूंना आदरांजली वाहिली. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डादेखील राजघाटावर आयोजित प्रार्थना सभेत सहभागी झाले होते.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी विजय घाटवर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 



पंतप्रधान मोदींनी ट्विट करत, 'बापूंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहू. गांधीजींनी मानवतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल नेहमी आभारी राहू' असे म्हणत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.


'जय जवान, जय किसान'ची घोषणा देत देशात नव-उर्जा आणणाऱ्या माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मोदींना त्यांना नमन केले आहे.



आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची ११६वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने देशभरात अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.