भोपाळ : रेल्वेतून प्रवास करतांना डब्यातील टॉयलेटमध्ये फसल्याने एका काँग्रेस नेत्याला बाहेर काढण्यासाठी रेल्वे हेल्पलाइनची मदत घ्य़ावी लागली. मध्य प्रदेश काँग्रेस कमेटीचे नेते चंद्रिका प्रसाद दिवेदी शताब्दी एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये फसले. दीड तासानंतर त्यांना बाहेर काढलं गेलं. चंद्रिका प्रसाद दिवेदी ज्या डब्यातून प्रवास करत होते त्या टॉयलेटची कडी अचानक जाम झाल्याने त्यांना मनस्ताप झाला. त्यांना बराच वेळ मदतीसाठी आवाज दिला पण कोणीच मदतीला आलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दिवेदी यांनी मुलाला फोन लावून सर्व घटना सांगितली. त्यानंतर त्यांच्या मुलाने रेल्वे हेल्पलाईन नंबरवर फोन लावला. हेल्पलाइन नंबर 139 पर कॉल केला पण त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. त्य़ानंतर त्यांनी रेल्वेचा टोलफ्री नंबर 1512 वर कॉल केला आणि जवळपास अर्ध्या तासानंतर संध्याकाळी 4.50 मिनिटांनी ललितपूर जीआरपीशी संपर्क झाला. यानंतर जीआरपीने ट्रेनमध्ये असणाऱ्या टेक्निकल टीमला याची माहिती दिली. एक तासानंतर चंद्रिका प्रसाद दिवेदी यांना बाहेर काढण्यात आलं.