रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : मनात नाही नांदणं आणि पोवाळं मांडणं अशी अवस्था प्रकाश आंबेडकरांची झाल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक उमेदवारासंदर्भात काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक दिल्लीत झाली. यानंतर झी २४ तासशी बोलताना त्यांनी वंचित आघाडीवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसची पहिली यादी ५ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. तीन तासांहुन अधिक वेळ चाललेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेससोबत आघाडी करण्याचं आंबेडकरांच्या मनांत नाही. कडूनिंबाच्या पाल्यात साखर घातली तरी गोड होत नाही. त्यामुळे आंबेडकर यांच्या मनांत काय कडू आहे माहीत नाही असे वडेट्टीवार म्हणाले आहे. 


भाजपाला मदत होईल असं आंबेडकर वागत आहेत. आता आंबेडकर म्हणतात मला मुख्यमंत्री घोषित करा. त्यांनी वेळोवेळी भूमिका बदलली. त्यांचा अल्टिमेटम आम्ही मानत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 



राष्ट्रवादीसोबत १०६ जागांवर बोलणी झाली आहे. १० जागांवर राष्ट्रवादीसोबत वाद आहे. त्या मतदारसंघावर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा होईल. जिंकण्याची शक्यता असलेल्या जागांवर चर्चा झाली. ५ सप्टेंबरला आणखी एकदा दिल्लीत बैठक होईल आणि पहिली यादी येईल असेही वडेट्टीवार यांनी म्हणाले.