नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस हक्कभंगाचा ठराव लोकसभेत मांडणार आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधातही हा हक्कभंग ठराव असणार आहे. राफेल खरेदीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी हा ठराव आणण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


याआधी 20 जुलैला राफेल व्यवहाराबाबत राहुल गांधी यांनी लोकसभेत भाजपवर गंभीर आरोप केले होते. पण हे आरोप चुकीचे असल्याचं सांगत भाजपने त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाणार असल्याचं म्हटलं होतं. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर बोलतांना राहुल गांधी यांनी राफेल कराराविषयी खोटे आरोप केल्यानंतर संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याचं सांगितलं होतं.


राफेल कराराबाबत राहुल गांधी यांनी केलल्या वक्तव्यावर फ्रान्सनं एक पत्रक काढलं होतं. भारत आणि फ्रान्स यांच्यातील गोपनीय माहिती उघड न करण्याची हमी या सुरक्षाविषयक करारात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.