नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे आता राजकीय पक्षांमध्ये परस्परांची उणीदुणी काढण्याची स्पर्धा लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या एक मिम  व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि जनसंपर्क विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी हे मिम ट्विट केले असून त्यावरुन भाजप-काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. या मिमच्या माध्यमातून त्यांनी मोदीभक्तांना लक्ष्य केलेय. मोदींच्या तीन भक्तांपैकी एकजण इतर दोघांइतकाच मूर्ख असतो, असा उपरोधिक संदेश मोदींच्या छायाचित्राखाली लिहण्यात आला आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदींच्या करिष्म्यामुळे ३२ टक्के जनतेने भाजपला मतदान केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या या ट्विटला भाजप समर्थकांनी प्रत्युतर द्यायलाही सुरुवात केली आहे. एका भाजप समर्थकाने म्हटले आहे की, तुम्हाला माहिती आहे का, राहुल गांधींच्या तीन समर्थकांपैकी तिघेही राहुल गांधींइतकेच मूर्ख आहेत. 


राहुल गांधींकडून दहशतवाद्याचा चक्क मसूद अजहर'जी' असा उल्लेख


दिव्या स्पंदना यांच्याकडून मोदींवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सप्टेंबर महिन्यात एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'चोर' असा केल्यामुळे दिव्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकीय जाणकारांच्या अंदाजानुसार २०१६ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प समर्थकांवर टीका करताना त्यांचा उल्लेख 'Basket of deplorables' असा केला होता. दिव्या स्पंदनाही मोदी यांच्यावर टीका करताना अशा पद्धतीचा अवलंब करत असल्याचे दिसत आहे.




VIDEO: राहुल गांधी विद्यार्थिनीला म्हणाले, मला सर नको फक्त राहुल म्हण...