हरियाणा : हरियाणा काँग्रेसने आमदार कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगबाबत पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कुलदीप बिश्नोई यांना मोठा धक्का बसला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलदीप बिश्नोई यांची पक्षाच्या सर्व विद्यमान पदांवरून हकालपट्टी केली आहे. पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी बिश्नोई यांना काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यासह पक्षाच्या जबाबदाऱ्यांवरून तत्काळ प्रभावाने मुक्त केले आहे. बिश्नोई यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेसकडून हरियाणा विधानसभा अध्यक्षांनाही शिफारस केली जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. 


बिश्नोई यांचे ट्वीट 
हरियाणातून राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाल्यानंतर बिश्नोई यांनी ट्वीट केले आहे की, 'सापाचा फणा चिरडण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे, सापांच्या भीतीने जंगल सोडू नका. गुड मॉर्निंग.' त्यांनी एका ट्विटर युजरचे ट्विटही रिट्विट केले, ज्यात म्हटले आहे की, 'योग्य वेळी घेतलेला निर्णय एखाद्या व्यक्तीला इतरांपासून वेगळे करतो.' असे या ट्विटमध्ये म्हटलेय.  


निकटवर्तीयाचा घात 
कुलदीप बिश्नोई हे राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. त्यांची बंडखोर वृत्ती काँग्रेसला एवढी भारी पडली आहे की, माजी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे नेते अजय माकन यांचा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला.  माकन यांचा भाजप समर्थित अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांच्याकडून चुरशीच्या लढतीत पराभव झाला.