बंगळुरु : कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरु आहे. भाजप आमदार खरेदी करत असल्याचा आरोप जेडीएसने केला आहे. काँग्रेसने सावधगिरी म्हणून आमदारांना गुप्त ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  बेंगळुरुमधल्या ईगल्सटन रिसॉर्टमध्ये या आमदारांच्या राहण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने यासाठी 100 खोल्या बुक केल्या आहेत.


जुलै 2017 मध्ये येथेच थांबले होते आमदार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते शिवकुमार यांनी देखील याबाबत दुजोरा दिला आहे. आमदारांना सुरक्षित ठेवायचं आहे. .आमची पुढची योजना काय असेल हे लवकरच सांगू असं देखील त्यांनी म्हटलं आहे. ईगल्सटनमध्ये जुलै 2017 मध्ये गुजरातच्या काँग्रेस आमदारांना ठेवण्यात आलं होतं. ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत 6 आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर 44 आमदारांना येथे सुरक्षित ठेवण्यात आलं होतं.



काँग्रेस नेत्याचं आहे हे रिसॉर्ट


ईगल्सटन रिसोर्ट काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांचंच असल्याचं बोललं जातं आहे. यात्रा डॉट कॉम(www.yatra.com) च्या अनुसार रिसॉर्टच्या एका खोलीचं भाडं 6255 रुपये आहे.  रिसॉर्टमध्ये रेस्टोरंटसह फिटनेस सेंटर देखील आहे. 4 स्टार रेटिंग असणाऱं हे रिसॉर्ट 24 तास सुरु असतं. यामध्ये आणखी विविध आलिशान सुविधा आहेत.