नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जगभरातील दौरे हे जसा चर्चेचा विषय ठरतो. तसेच, त्यांनी जगभरातील देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्रप्रमुखांना दिले-घेतलेले अलिंगनही चर्चेचा विषय ठरतो. काँग्रेसने मोदींच्या या आलिंगनांवर निर्मित एक व्हिडिओ ट्विट केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. देशभरातून त्यावर अनेक क्रिया प्रतिक्रियाही येत आहेत.


'हग डिप्लोमसी'वर व्हिडिओ, राजकीय वादाची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांग्रेसने केलेल्या ट्विटला निमित्त ठरले आहे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांचा भारत दौरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल तोडून त्यांचे केलेल स्वागत. हे स्वागत करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलप्रमाणे नेत्यानाहू यांना आलिंगन दिले. जगभरातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्याची भलेही मोदींची ही हटके स्टाईल असेल. पण, विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने त्यात काहीसा विनोद शोधला आणि तशा पद्धतीचा व्हिडिओही ट्विटरवर अपलोड केला. मोदींच्या या हग डिप्लोमसीवर काँग्रेसने केलेला विरोध राजकीय वाद निर्माण करू शकतो अशी चिन्हे आहेत.


काय आहे व्हिडिओ


काँग्रेसने पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओत मोदींच्या आलिंगन देण्याच्या या सवयीवर टीप्पणी करण्यात आली आहे. या व्हिडिओत मोदींनी जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांची घेतलेली आणि दिलेल्या आलिंगनांची छायाचित्राची स्लाईड बनविण्यात आली आहे. तसेच, त्यावर 'काहीसे अती' असेही म्हटले आहे.



या व्हिडिओत जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि त्यांची पत्नी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तुक्रीचे राष्ट्रपती तय्यप एर्दोगन, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांच्यासोबत गळाभेट घेताना आणि जर्मनीच्या चान्स्लर एजेला मार्केल यांच्याशी चर्चा करताना मोदी दिसत आहेत.