राजकोट : हिंगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना गुजरात पोलिसांचा मार खावा लागलाय. राजकोट पश्चिम मतदार संघातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं इंद्रनील राजगुरू यांना मैदानात उतरवलंय. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि काँग्रेस हे दोघेही कंबर कसून प्रचार करतायत. या दरम्यान इंद्रनील राजगुरू यांचे भाऊ दीप राजगुरू यांच्यावर भाजपाचे पोस्टर काढल्यावरुन हल्ला झाला होता. त्यात भाजपचा हात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. या रागातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घराबाहेरचे पोस्टर काढण्याचा प्रयत्न सातव यांनी केला. यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.


हा वाद शमवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात सातव यांनाही मारहाण झाली. या प्रकरणी पोलिसांनी सातव यांना अटक केली. पोलिसांनी त्यांना अटक करुन त्यांची जामिनावर सुटका केलीय. गुजरात पोलिसांचा हा लाठीचार्ज म्हणजे हिटलरशाही असल्याचा आरोप राजीव सातव यांनी केलाय.