नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये जेडीएससोबत मिळून सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आमदार प्रेमचन्द्र मिश्रा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना एक ऑफर दिली आहे. काँग्रेस नेत्याने म्हटलं की, नीतीश कुमार सेक्यूलर विचारधारेचे आहेत. काँग्रेसचा प्रयत्न आहे की, सेक्यूलर विचारधारेच्या सगळ्या लोकांना एकाच मंचावर आणलं जावं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेता मिश्रा यांनी म्हटलं की, भाजपच्या पापाचा घडा भरला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देखील कमी झाली आहे. भाजप आता बुडतं जहाज आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश निवडणुकीनंतर एनडीएमध्ये मोठ्या प्रमाणात भगदड पडणार आहे. अशात सेक्यूलर विचारधारे ठेवणाऱ्या सर्व पक्षांना एकत्र येणं महत्त्वाचं आहे.


नीतीश कुमार यांचं नाव न घेता त्यांनी म्हटलं की, काही नेते ते सेक्यूलर असल्याचा दावा करतात. असे नेते जर एकत्र येण्याचा विचार करतील तर काँग्रेस पक्ष त्यांचं स्वागत करेल. कारण आम्ही समान विचारधारा असेलेल्या लोकांना एकत्रित करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहोत. 


दुसरीकडे काँग्रेसने राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे आरजेडी आणि काँग्रेस यांचं सरकार बनवण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याची मागणी केली आहे. प्रेमचन्द्र मिश्रा यांनी म्हटलं की, राज्यपाल आरएसएसचे नाही तर समाजवादी विचारधारेशी जुडलेले आहेत. अशातच काँग्रेस-आरजेडी युतीला एक संधी दिली पाहिजे.