शिमला : पाच राज्यांच्या निवडणुका आता पार पडल्यात... मुख्यमंत्री पदाचे निर्णयही मार्गी लागलेत... त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल सुट्टीवर निघालेत. या निवडणुकांदरम्यान प्रचारात झोकून देणाऱ्या राहुल गांधींनी आता थोड्या विसाव्यासाठी शिमल्याची वाट धरलीय. राहुल गांधी आपली बहिण प्रियांका वाड्रा आणि त्यांच्या मुलांसोबत हिमाचल प्रदेशच्या शिमल्यात दाखल झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका यांच्यासोबत राहुल मंगळवारी १८ डिसेंबर रोजी रस्तेमार्गानं शिमल्याला दाखल झालेत.


राहुल गांधी शिमल्यात

छराबरा या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या प्रियांका यांच्या घराच्या कामाची पाहणीही यावेळी राहुल गांधींनी केली.


रस्त्यात सोलान जिल्ह्यातील एका ढाब्यावर त्यांनी काही वेळेसाठी विश्रांती घेत आरामात चहा-नाश्त्याचा आस्वाद घेतला. याची कुणकुण लागताच स्थानिक काँग्रेस नेते आणि काही महिलाही तिथं दाखल झाल्या.


प्रियांका वाड्राही राहुल गांधींसोबत शिमल्यात

स्थानिक नेत्यांच्या माहितीनुसार, राहुल गांधींचा हा कौटुंबिक आणि खाजगी दौरा आहे... राहुल, प्रियांका आणि त्यांची मुलं छराबराच्या एका हॉटेलमध्ये उतरल्याचंही त्यांनी म्हटलंय. 


पाच राज्यांच्या निवडणुकीत तीन राज्यांत काँग्रेसला मिळालेलं यश निश्चितच पक्षाला उभारणी देणारं ठरलंय. प्रियांका वाड्राही काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीतून राजकारणात परतणार असल्याचं म्हटलं जातंय.