नवी दिल्ली : आम्ही प्रेमाने देश बदलू इच्छितो आणि नरेंद्र मोदी लाल किल्ल्ल्यावरून सांगतात की 70 वर्षात काहीच बदलले नाही. स्वांतत्र्यानंतर काहीच झाले नाही ? स्वातंत्र्यानंतर काहीच बदलले नाही ? नरेंद्र मोदी असे दाखवू इच्छितात की त्यांनीच सर्वकाही केले आहे. हा केवळ कॉंग्रेसचाच अपमान नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीचा अपमान करत असल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राजस्थानमधील अजमेरमध्ये ते बोलत होते. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी अजमेरमध्ये कॉंग्रेसच्या दोन दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशनास मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज देशामध्ये विचारधारेची लढाई सुरू आहे. एका बाजूला आरएसएस आणि भाजपा आणि दुसऱ्या बाजूस कॉंग्रेसची विचारधारा. त्यांना देशात द्वेश पसरावायचा आहे आणि आम्हाला प्रेम. नरेंद्र मोदी शिव्या देतात आणि कॉंग्रेसला मिटवण्या बद्दल बोलतात. पण द्वेशाने द्वेश मारता येत नाही. 


'कॉंग्रेस सेवादलास सर्वात मजबूत आणि महत्त्वाची संघटना बनवण्यासाठी काम करेल. यासाठी लाखो तरुणांना सेवादलाशी जोडावे लागेल. देशात कुठेही विपरीत घटना घडेल तिथे सेवादल जाऊन काम करेल. याव्यतिरिक्त संघ जिथे द्वेश पसरवेल तिथे सेवादल प्रेम पसरवण्याचे काम करेल. ते लाढीमार करतील, तुम्ही गळाभेट घ्या. या देशात द्वेश द्वेशाला नाही मारणार' असेही राहुल गांधी यांनी म्हटले. 



राहुल यांनी यावेळी 'चौकीदार चोर है' चा नारा देखील दिला. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या निवडणूकीत राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेसच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 


राजस्थाननंतर राहुल गांधी गुजराचचा दौरा करतील. तिथे वलसाडमध्ये एका जनसभेला ते संबोधित करतील. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने चांगले प्रदर्शन केले होते.