रायपूर : बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून परागंदा झालेल्या मेहूल चोक्सीनं अर्थमंत्री अरूण जेटलींच्या मुलीच्या खात्यावर पैसे जमा केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. एका ज्येष्ठ मंत्र्यावर इतका मोठा आरोप केला जात असताना मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र याबाबत पूर्ण अनभिज्ञ असल्याचं उघडकीस आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये जाहीर सभा घेतल्यानंतर विमानतळावर त्यांना याबाबत प्रश्न विचारला. मात्र गांधी यांना या आरोपांबाबत काहीही माहिती नसल्याचं स्पष्ट दिसलं. केवळ एका वाक्यात उत्तर देऊन त्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे लिहून दिलेल्या भाषणांखेरीज गांधी यांना अन्य माहिती किती असते, असा प्रश्न भाजपाचे नेते आता खासगीत विचारू लागले आहेत.


राहुल गांधी याबाबत अनभिज्ञ असले तरी काँग्रेसनं केलेले आरोप मात्र गंभीर आहेत. मेहूल चोक्सीला पळून जाण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटलींची मुलगी सोनाली जेटली आणि त्यांचे पती जयेश बक्षी यांनी मदत केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. देशातल्या सगळ्या महत्वाच्या एजन्सींना मेहुल चोक्सी पळून जाणार आहे याची संपूर्ण कल्पना होती. पण त्याविषयी काहीच कारवाई करण्यात आली नसल्याचं काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटलंय.